Eknath Shinde । काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या याच हिंसक वक्तव्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. त्यानुसार आता त्यांच्या वक्तव्याची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यानंतर गृहखातं आक्रमक झाल्याचे दिसून आले. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं का, यामागील सर्व षडयंत्र बाहेर येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
अशात विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधान परिषदेत बोलतांना विरोधकांना आवाहन केले की,’खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत कुणी बोलू लागलं तर कुणालाही पाठिशी घालू नये. विरोधकांनी यात राजकारण आणू नये’
ते पुढे म्हणाले,’प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलले पाहिजे. जरांगेंच्या भाषेला, विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय तेव्हा मीदेखील बोललो. मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या कुणावरही हल्ले होतील त्यामुळे सरकार म्हणून आम्ही पाठिशी आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे न्यायचे आहे. जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे. एसआयटीच्या चौकशीतून जे सत्य आहे ते बाहेर येईल. जे खरे ते समोर आले पाहिजे. कुणावरही सूडबुद्धीने आकसाने कारवाई केली नाही आणि करणार नाही.असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
हेही वाचा
SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, “आता मी सर्व…”