पुणे: दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी विराज दारवाटकर (104 धावा) याने केलेली शतकी खेळीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने डेक्कन जिमखाना संघापुढे 312 धावांचे आव्हान उभे केले आहे.
या स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज 81 षटकात 8 बाद 312 धावा करून संघाचा डाव घोषित केला. यात विराज दारवाटकर याने धडाकेबाज फलंदाजी करताना 161 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.
विराज व राजवर्धन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 229 चेंडूत 152 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. डेक्कन जिमखानाकडून आर्यन बांगले (104-4) व रेहान खान (60-3) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पूना क्लब संघाने दिवसअखेर 7 षटकात बिनबाद 40 धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा अथर्व वणवे 25 तर, यश बोरामनी 9 धावांवर खेळत आहेत.