Imp News | Covid-19 : रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या पदार्थांची यादी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर; जाणून घ्या

नवी दिल्ली : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे अन्न आवश्यक आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आपल्या mygovindia ट्विटर हँडलवर काही खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे, हे पदार्थ कोविड 19 संकटाच्या दरम्यान आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतील.

कोरोना रूग्णांसाठी आहार

कोरोना रूग्णांसाठी केंद्र सरकारने डार्क चॉकलेट, हळद असलेले दूध, प्रथिनेयुक्त पदार्थांची शिफारस केली आहे. mygovindia च्या ट्विटर हँडलवर सरकारने बेसिक डाएट प्लॅन सुचविला आहे. याचे पालन केल्यास प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि स्नायूंची शक्ती आणि ऊर्जा वाचविण्यात मदत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोरोना काळात खलील पदार्थांचे सेवन करावे

नाचणी, ओट्स आणि अमरनाथ सारख्या संपूर्ण धान्यांचा वापर आहारात करावा.

कोंबडीचे मांस, मासे, अंडी, सोया, नट, चीज यासारख्या प्रथिनांचा चांगला स्त्रोत असलेले खाद्यपदार्थ खावेत.

बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल यासारख्या गोष्टींचा खाद्यपदार्थत वापर करावा.

नियमित शारीरिक हालचाल जसे की योग आणि श्वास व्यायाम (प्राणायाम) करणे आवश्यक आहे.

चिंतेपासून मुक्त होण्यासाठी कमी प्रमाणात डार्क चॉकलेट खा, ज्यामध्ये कमीतकमी 70 टक्के कोको असेल.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध दिवसातून एकदा प्यावे. आहारामध्ये आंबा पावडरचा समावेश करणे देखील योग्य आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.