NZ vs PAK 1st T20, Mitchell Santner Corona Positive : या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. एकीकडे टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून पाच टी-20 सामन्याची महत्त्वाची मालिका सुरू झाली आहे. पण ही मालिका सुरू होण्याआधीच धोक्याची घंटा वाजली आहे आणि कोरोनाने मालिकेत प्रवेश केला आहे.
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये दस्तक(शिरकाव) दिली आहे. 2020 मध्ये दीर्घकाळ क्रिकेट थांबवणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा क्रिकेटवर आक्रमण केले आहे. वास्तविक, न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू मिचेल सँटनरला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 खेळू शकला नाही.
मिचेल सँटनर सामन्यापूर्वी केलेल्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिचेल सँटनरला पूर्ण विश्रांती आणि घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.
NZ’s Mitchell Santner to miss first T20I against Pakistan, tests positive for COVID-19
Read @ANI Story | https://t.co/xZRweOhnqx#MitchellSantner #NZvsPAK #cricket #NewZealand pic.twitter.com/1tBEiZc2Zl
— ANI Digital (@ani_digital) January 12, 2024
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळवला गेला. ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह किवींनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा T20I सामना आता रविवार, 14 जानेवारी रोजी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे होणार आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 226 धावा केल्या. डॅरेल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिचेलने 27 चेंडूत 61 धावा केल्या तर विल्यमसनने 42 चेंडूत 57 धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्बास आफ्रिदीने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदीनेही प्रत्येकी 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ संपूर्ण षटकही खेळू शकला नाही आणि 18 षटकांत 180 धावा करून सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून माजी कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 57 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 4 बळी घेतले.