नवी दिल्ली – देशभरात करोनाने थैमान घातलं आहे. दररोज करोनामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. ज्येष्ठ, तरुण आणि मुलंही करोनाचे बळी ठरत आहेत. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना करोनाने लक्ष्य केल आहे. त्यातच आता अभिनेता राहुल व्होरा याचं करोनाने निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता राहुलने मृत्यूपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट समोर आली आहे. ही पोस्ट राहुलने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनिष सिसोदिया यांना टॅक केलं होती.
राहुलने शनिवारी फेसबुकवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं की, ‘जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो. मी लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता मी धैर्य गमावले आहे.’ यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनिष सिसोदिया यांनाही टॅग केलं होत.
मुळचा उत्तराखंडचा असणारा राहुल ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय होता. नेटफ्लिक्स (Netflix) वरील वेबसीरिज (Freedom) ‘फ्रीडम’मध्ये तो दिसला होता. राहुलला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याची तब्येत अधिकच खालावली. अखेर त्याने पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणेच त्याचा मृत्यू झाला.