पुणे – पुणे शहराने अलीकडच्या काळात नद्यांच्या बाबतीत अनेक बदल पाहिले आहेत. यामध्ये पूर, मैदानातील बांधकामे, नद्यांचे चॅनलीकरण, मलबा आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे यांचा समावेश होतो. ज्यामुळे नदीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर गंभीर परिणाम झाला आणि मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवांचे निवासस्थान नष्ट किंवा बदलले आहेत.
अनेक शहरातील नद्यांच्या प्रदूषणाबाबत यादीच तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्यातील मुळा-मुठा नद्यांचे नाव वरच्या श्रेणीत आहे. कचरा, सांडपाणी आणि अनेक प्रकारचे विखंडन यामुळे शहरी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शहरीकरणापूर्वी आणि आताच्या फ्लोरिस्टिक विविधतेमधील बदलांची तुलना करण्याचा प्रयत्न या अभ्यासातून केला गेला.
संशोधकांना आठ स्थानिक प्रजाती आढळून आल्या, ज्यात स्थानिक (द्वीपकल्पीय भारतातील स्थानिक), (पूर्व आणि पश्चिम घाटात आढळणाऱ्या स्थानिक, केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या, मध्य भारतातील स्थानिक अशा विविध प्रजाती आढळल्या आहेत. यातील एरिओकॉलॉन डॅलझेली ही प्रजाती आंतरराष्ट्रीय युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) च्याअति धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या यादीत नमूद केल्या आहेत. १९५८ मध्ये प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ व्ही. डी. वर्तक यांनी विठ्ठलवाडी आणि येरवडा दरम्यानच्या नदीकाठच्या विविधतेचा अभ्यास केला होता.
वनस्पतींचे अस्तित्त्व वाचवण्यासाठी काय करायला हवे?
– वृक्ष तोडणे, कचरा टाकणे आणि बांधकाम भंगार डंपिंग करणे बंद, मानवी हस्तक्षेप कमी करणे.
– नैसर्गिक पुनरुत्पादन सुलभ करण्यासाठी आणि सूक्ष्म निवास विविधता टिकवून ठेवण्यासाठी नदीकाठाचे पर्यावरणीय नियोजन करणे
– नदीच्या बाजूने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे.
– सिमेंट मटेरिअलचा वापर टाळणे. कारण ते रिपेरियन सूक्ष्म निवासस्थान नष्ट करते.
– स्थानिक झाडे, गवत आणि पाणथळ वनस्पतींच्या प्रजाती यासारख्या वनस्पती वाढवणे.
– सिमेंटच्या भिंती काढून टाकणे आणि गवताळ प्रदेश, ओलसर जमीन, स्क्रब किंवा मूळ झाडे असलेल्या बफर पट्ट्या विकसित करणे.
याठिकाणी अजूनही आहेत काही प्रजातींचे अस्तित्त्व
खडकवासला- ९३
नांदेड सिटी- ८१
शिवणे- ८२
विठ्ठलवाडी- १००
एस.एम.जोशी पूल परिसर- ८३
संभाजी पार्क मागील बाजूस- ६०
संगम पूल परिसर – ७०.