नगर | शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध धंद्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करत ३० दिवसांत १२६ छापे टाकून १४३ संशयीत आरोपींना अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांंच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाने अवैध देशी दारूची विक्री, हातभट्टीची दारू तयार करणे, मटका, बिंगो यासह इतर अवैध व्यवसायांचा शोध घेऊन कारवाई केली. या बाबत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.