वर्तुळाकार रस्त्याचे काम लवकरच सुरू : मिसाळ

पुणे – शहरातील उपनगरीय वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या वर्तुळाकार उच्च क्षमता वाहतूक मार्गाचे काम पुढील दोन महिन्यांत सुरू होईल, असा विश्‍वास आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्‍त केला.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 28 मध्ये प्रचार फेरीचे आयोजन केले होते.

शहर भाजपचे सरचिटणीस दीपक मिसाळ, सभागृहनेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक प्रवीण चोरबेले, नगरसेविका कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, माजी नगरसेवक वंदना भीमाले, डॉ. भरत वैरागे, मनीषा चोरबेले, श्रीकांत पुजारी, अनिल भन्साळी, मनोज देशपांडे, अनिल नेरुळकर, सतीश काळे, विशाल पवार, किरण रामसीना, राजेंद्र सरदेशपांडे, गणेश शेरला, रमेश बिबवे, संजय गावडे, राहुल मेहता, राहुल लडकत, निखिल शिळीमकर, राहुल लडकत यांचा प्रमुख सहभाग होता.

पुणे शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेऊन 1987 मध्ये पहिल्यांदा विकास आराखड्यात एचसीएमटीआर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. हा प्रकल्प आधीच पूर्ण झाला असता तर आज शहराच्या विविध भागांत उड्डाणपुलांसाठी मोठा खर्च करावा लागला नसता. प्रकल्पामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली असती.

शहरातील 60 महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारा हा प्रकल्प 37 किमी लांबीचा आणि 24 मीटर रुंदीचा असणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी बीआरटीची अखंडित बससेवा मिळणार आहे. 26 एलिव्हेटेड स्थानके आणि बीआरटी स्थानकांपासून पीएमपीची सेवा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. बिबवेवाडी, दत्तवाडी, पर्वती या उपनगरांमध्ये हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.