पुणे – महाराष्ट्र ‘सीआयडी’ची वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली आहे. लिजन नावाच्या एका ग्रुपने ही वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या mahacid.gov.in या लिंकवर क्लिक केल्यास हॅकरचा ‘सीआयडी डिपार्टमेंट वेबसाईट हॅक’ असा संदेश येत असून, हा संदेश ‘इमाम महदी नामक’ व्यक्तीच्या नावे येतो.
दरम्यान, या मेसेजमध्ये भारतीय पोलीस आणि मोदी सरकारला चेतावनी देत ‘मुस्लिम समाजाला त्रास देणे बंद करा… ते सर्वत्र आहेत. मुस्लीम बांधवांच्या शक्तीची कल्पना असून द्या… लवकरच इमाम माहदी येत आहे’ असा थेट इशारा पोलीस आणि सरकारला हॅकर्सनी दिला आहे.