Chitra Wagh on Rupali Chakankar – चित्रा वाघ यांनी छेडलेले उर्फी जावेद प्रकरण आता महिला आयोगापर्यंत येऊन पोहचलं आहे. चित्रा वाघ यांनी, पत्रकारपरिषद घेत राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होत. यावेळी त्यांनी, अभिनेत्री तेजस्वी पंडितला राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवल्याचा उल्लेख केला होता. चित्रा वाघ यांच्या आरोपांचे आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकारपरिषद घेत खंडन केले आहे. अनुराधा वेबसिरीज प्रकरणी तेजस्विनी पंडीतला नव्हे तर दिग्दर्शक जाधव यांना महिला आयोगाने नोटीस धाडले असल्याचा खुलासा चाकणकर यांनी केला. यावेळी त्यांनी, वाघ यांच्याकडून महिला आयोगाची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा ठपका ठेवत त्यांना नोटीस बजावल्याचं म्हंटलं होत. राज्य महिला आयोगाने नोटीस बजावल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ? | Chitra Wagh on Rupali Chakankar
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे.. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..!”
“जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली… असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!” असही चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.
चित्रा वाघ व रुपाली चाकणकर या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहकारी होत्या. चित्रा वाघ यांनी २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या मेगा भरतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. रुपाली चाकणकर या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? | Chitra Wagh on Rupali Chakankar
अभिनेत्री मॉडेल उर्फी जावेद सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून फिरते तिच्यावर कारवाई करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. राज्य महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घ्यावी असेही चित्रा वाघ यांनी म्हंटले होते. रुपाली चाकणकर यांनी मात्र, कोणते वस्त्र परिधान करावेत हा ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार असल्याचे सांगितले होते. यानंतर चित्रा वाघ राज्य महिला आयोगाविरुद्ध आक्रमक झाल्या होत्या.
स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे..
राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..!
जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही…
(१/२)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 6, 2023