बीजिंग- पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या करोनाबाधितांवरील उपचारासाठी चीनने यापूर्वी वैद्यकीय सामुग्री आणि वैद्यकीय पथकाची मदत पाठवून दिली आहे. आता पाकिस्तानातील रुग्णांसाठी तात्पुरत्या हॉस्पिटलची उभारणीही पाकिस्तानकडून केली जाणार आहे. पाकिस्तानमधील बिघडणाऱ्या स्थितीला सांभाळण्यासाठी चीनकडून लवकरच एक तात्पुरते हॉस्पिटल उभारले जाणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले.
टेस्टींग किट, मास्क, प्रोटेक्टीव्ह सूट आणि व्हेंटिलेटर आदी सामुग्री चीनकडून पाकिस्तानला दिली गेली आहे. जे तात्पुरते हॉस्पिटल उभे केले जाणार आहे, त्याचे बांधकाम गेल्याच आठवड्यात सुरू झाले आहे, असेही चुनयिंग यांनी सांगितले.
चीनने फेब्रुवारी महिन्यात वुहान प्रांतात 2,300 खाटांच्या क्षमतेचे तात्पुरते हॉस्पिटल उभारले होते. त्याच धर्तीवर ह् हॉस्पिटलदेखील उभारले जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय तज्ञांबरोबर मार्गदर्शनासाठी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी पाकिस्तानी डॉक्टरांना पाचारण केले गेले असल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.