येरवडा (प्रतिनिधी )- ‘ साहेब आज माझ्या 2 नंबर मुलीचा वाढदिवस आहे आणि आमच्याकडे पैसेबी नाही आणिना घरात धान्य बी नाही, आज जर मला धान्य मिळले तर मी त्यात स्वयंपाक करून कमीतकमी तिला तरी जेवायला घालू शकेल. त्या महिलेची व्यथा फोनवरून ऐकताच महसूल अधिकाऱ्यानी तात्काळ त्या महिलेला एका महिन्याचे धान्य दिलेच पण त्या महिलेच्या मुलीचा वाढदिवस केक कापून नवीन कपडे देऊन साजरा केला.
हवेलीचे मंडळ अधिकारी व्यंकटेश चिरमुला तसेच सहकारी मंडळ अधिकारी हडपसर गणेश सुतार
तलाठी, फुरसुंगी राजेश दिवटे तलाठी, हडपसर चे शिवाजीराव देशमुख तलाठी व सतीश पांचाळ या सगळ्यांची यावेळी मदत झाली. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अनेक राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी वेगवेगळ्या हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत. अशीच एक पोस्ट
वाचून हडपसर मधील एका महिलेचा कार्यालयात एक कॉल आला की, हडपसर मधून सौ.
सारीका हनुमंत भंडारी सर्वे नंबर 223/१ ,त्रिमूर्ती कॉलनी, कंपनी रोड, रवी दर्शन, जैन मंदिर शेजारी हडपसर पुणे 28, येथून बोलते आहे. आमच्या घरची परिस्थिती सध्या खूपच बिकट असून लॉकडाऊन मुळे, माझे काम ही सुटले आहे. घरात धान्याचा कण नाही आणि मी आणि माझ्या मुली 2 दिवस झाल्या उपाशी आहेत. मुली ही खूप रडत आहेत, मी माझ्या घरी एकटी कमवणारी आहे. 3 मुली
आहेत. साहेब तुमच्याकडून काही मदत मिळेल का ? अशी विनवणी त्या महिलेने भारतीय
राष्ट्रवादी पार्टी युवा प्रदेशाध्यक्ष प्रकाश संचेती यांना केली.त्यांनी ही माहिती व महिलेचा फोन नंबर महसुल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांना दिला.
चिरमुलानी त्या महिलेशी संपर्क केला आणि त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना लवकरात लवकर तुमच्याकडे मदत पोहोचेल असे सांगितले. मात्र त्या महिलेने त्यांना विनंती केली की आजच मदत मिळली तर बरे होईल अशी वारंवार विनंती करताच महसूल अधिकारी यांना खटकले की काही तरी अडचण दिसतेय. तर तुम्हाला आजच का पाहिजे अशी विचारणा करताच ती महिलेनी सांगितले,” साहेब की आज माझ्या 2 नंबर मुलीचा वाढदिवस आहे आणि आमच्याकडे पैसेबी नाही आणिना घरात धान्य बी नाही, आज जर मला धान्य मिळले तर मी त्यात स्वयंपाक करून कमीतकमी तिला तरी जेवायला घालू शकेल.* त्या महिलेची व्यथा ऐकताच त्यांनी त्या महिलेला शब्द दिला की टेन्शन घेऊ नका मी मदत पाठवतो. लगेच उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर आणि तहसीलदार सुनिल कोळी साहेबांना या विषयाची माहिती दिली त्यांनी योग्य मदत देण्यास सांगितले.
व्यंकटेश चिरमुला यांनी अनोख्या पद्धतीने मदत करण्याचे ठरविले. वाढदिवसाचा केक बिस्किटाचे पुडे आणि अन्नधान्याचे किट घेऊन चिरमुला आणि त्यांचे सहकारी 5.30 वाजता त्या महिलेच्या घरी पोहचले आणि त्यांच्या सर्व सामुग्री हाती देऊन त्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा केला. हे सर्व
पाहून त्यांच्या परिवराच्या व महिलेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू अनावर झाले आणि त्या म्हणाल्या की मी स्वप्नातही विचार केला नव्हता की अशा स्थितीमध्ये घरात अन्नाचा कण बी नसतांना माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा होईल. त्या महिलेनी सर्व अधिकारी यांचे आभार मानले. आभार मानत असताना
तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र काही थांबत नव्हते. स्वतःच्या वाढदिवसापेक्षा जास्त आनंद या वेळी झाला असे व्यंकटेश चिरमुल्ला सांगितले.