पुणे – कंटेनमेंट झोनमध्ये लवकर रुग्णवाहिका मिळाली नसल्यामुळे , एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील नाना पेठ परिसरात हा प्रकार घडला आहे. पुण्यात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास नाना पेठेतल्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. यशूदास मोती फ्रान्सिस (वय 54, रा. नानापेठ) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या बाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसारीत होतं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तब्बल अडीच तास आरोग्य यंत्रणाशी संपर्क साधूनही रूग्णवाहिका न मिळाल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणने आहे. पुणे राज्यातील रेड झोन असलेल्या शहरांपैकी एक असल्यामुळं शहरातील हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. मध्य वस्तीतील नाना पेठेतही रस्ते सील करण्यात आले आहेत. त्याच परिसरात ही घटना घडली आहे. फ्रान्सिस कुटुंबीयांच्या मदतीसाठी प्रशासन आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.