लंडन – जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये चित्रविचित्र शहरे ठिकाणे आणि गूढ गोष्टी आढळतात या सर्व गोष्टींचा जनमानसावर परिणाम होताना दिसतो युनायटेड किंग्डममधील नॉरविच भागातील थोर्प हॅम्लेट हे गाव असेच आहे ज्या ठिकाणी घरातील पालक आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी रस्त्यावर पाठवत नाहीत गावामध्ये एकही लहान मुलगा रस्त्यावर खेळताना दिसत नाही यामागेही एक गूढ कारण दडले आहे.
या गावातील प्रत्येक रस्त्यावर भयावह आणि गूढ अशा प्रकारचे खड्डे आहेत आणि या खड्ड्यात जर कोणी माणूस पडला तर तो जिवंत बाहेरच येऊ शकत नाही अनेकवेळा रस्त्यावरील हे खड्डे दिसतच नाहीत पण चालता चालता सुद्धा माणूस त्या खड्ड्यामध्ये गडप होऊ शकतो या गूढ खड्ड्यांचा लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे घरातील पालक मुलांना रस्त्यावर खेळायला जाण्यास परवानगी देत नाहीत भौगोलिक परिभाषेत या प्रक्रियेला सिंकहोल असे म्हणतात जमिनीमध्ये अचानक एखादा खड्डा किंवा खोल भुयार तयार होते, आणि मनुष्य किंवा इतर जीवसृष्टीतील प्राणी त्यामध्ये गडप होऊ शकतात अनेक वर्षे या गावांमध्ये ह्या प्रकारची भौगोलिक प्रक्रिया सुरू असून कोणत्याही क्षणी रस्त्यावर एखादा खड्डा निर्माण होतो.
नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून प्रशासनाने या प्रक्रियेची दखल घ्यावी आणि लोकांचे जीवन सुरक्षित करावे असे मागणी केली आहे पण या समस्येवर तोडगा कसा काढावा हेच प्रशासनालाही करत नाही या गावातील एखाद्या घराच्या अंगणातील मोठे झाड रात्रीतल्या रात्रीत अशा प्रकारे गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत घरात आत्तापर्यंत जे खड्डे निर्माण झाले आहेत त्याच्याभोवती प्रशासनाने तारेचे कुंपण घातले आहे पण कोणत्याही क्षणी नवीन खड्डे निर्माण होण्याची भीती असल्यानेच लहान मुलांना रस्त्यावर पाठवण्यात येत नाही तसेच मोठी माणसे सुद्धा रस्त्यावरून वावरताना काळजी घेताना दिसतात अशाप्रकारे खड्डे निर्माण होण्याचे प्रमाण वाढत गेले तर गावातील अनेक घरे नष्ट होतील आणि एखाद्या भूकंपनंतर जशी परिस्थिती होती तशी स्थिती या गावाची होईल अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.