King Charles Has Cancer : ब्रिटनचे 75 वर्षीय राजे किंग चार्ल्स -3 यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. बकिंगहॅम पॅलेसने सोमवारी याविषयीची घोषणा केली. बकिंघम पॅलेसने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात, ”राजांवर काही काळापासून उपचार केले जात आहेत. त्यांच्या उपचारादरम्यान अनेक चाचण्या करण्यात त्या लक्षणांच्या चाचण्यांनी कर्करोगाच्या प्रकाराची पुष्टी केली आहे. मात्र, हा प्रोस्टेट कॅन्सर नसल्याचेही पॅलेसने म्हटले आहे.
I join the people of India in wishing speedy recovery and good health to His Majesty King Charles III. https://t.co/86mKg9lE1q
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2024
दरम्यान, प्रिन्स चार्ल्स यांना कर्करोग झाल्याचे वृत्त समोर येताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व जागतिक नेत्यांनी त्यांना लवकरात-लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, “प्रिन्स चार्ल्स लवकर बरे व्हावेत अशी सर्व देशवासीयांसह माझी इच्छा आहे…’
Wishing His Majesty a full and speedy recovery.
I have no doubt he’ll be back to full strength in no time and I know the whole country will be wishing him well. https://t.co/W4qe806gmv
— Rishi Sunak (@RishiSunak) February 5, 2024
तर, दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, माजी पंतप्रधान लिझ ट्रस, बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर यांनीही किंग चार्ल्सच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषी सुनक यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “प्रिन्स चार्ल्स लवकरच बरे होणार असून संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. बोरिस जॉन्सन म्हणाले की, संपूर्ण देश राजा चार्ल्सच्या पाठीशी आहे.