Chief Minister Yogi। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसून येत आहेत. त्यासाठी त्यांनी भव्य सभांचे आयोजन देखील केले आहे. त्यातच अलीगढमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे जनतेला आवाहन करत विरोधकांवर निशाणा साधलाय.
तेव्हा त्याचे ‘राम नाम सत्य’ निश्चित Chief Minister Yogi।
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिगढच्या सभेत महिलांच्या सुरक्षेविषयी जनतेला आश्वासन दिलं. त्यांनी यावेळी ,”मी प्रभू रामाचे नाव घेऊन आयुष्य जगतो. रामाशिवाय काम नाही. पण जेव्हा कोणी समाजाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतो तेव्हा त्याचे ‘राम नाम सत्य’ निश्चित असते. 10 वर्षांपूर्वी जे स्वप्न होते ते आज सत्यात उतरले आहे. तुमच्या एका मताच्या किंमतीमुळे ती निर्माण झाली आहे.
मत आमचे म्हणून आम्हीही पापाचे भागीदार Chief Minister Yogi।
विरोधकांवर निशाणा साधताना योगींनी ,”काही वर्षांपूर्वी मते चुकीच्या लोकांकडे गेली आणि देश भ्रष्टाचारात बुडाला. अराजकता आणि अशांततेत बुडाले होते… कर्फ्यू लावण्यात आला होता. अराजकता पसरली. गुंडगिरी सर्वत्र पसरली होती. मत आमचे आहे, म्हणून आम्हाला पापाचे भागीदार व्हावे लागेल. जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांना मत द्याल तेव्हा हे होईल.” असे म्हटले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही एक मत मोदींच्या नावावर दिले, तर मोदींची हमी तुमचे भविष्य घडवत आहे असे दिसेल. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, महामार्ग, रेल्वे, विमानतळे उभारली जात आहेत. डिफेन्स कॉरिडॉर, गुंतवणूक, वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठे, कारखाने उभारले जात आहेत. त्याचा फायदा भविष्यात आपल्याला नक्कीच होणार “असल्याचे त्यांनी सांगितले.