Pooja Bhatt| अभिनेत्री पूजा भट्टने अवघ्या 17 व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खानसह अनेक दिग्गज कलाकरांसोबत तिने काम केले आहे. नुकतेच ती बिग बॉस या शोमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत भाष्य केले आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पूजा भट्ट वयाच्या 52 व्या वर्षीही सिंगल लाईफ जगत आहे. अनेकदा चाहते आणि नातेवाईक तिला लग्न कधी करणार आहे? असा प्रश्न विचारतात. त्यावर आता एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. ‘सगळेजण मला तुझे लग्न कधी होणार आहे, तू सिंगल का आहेस, असे प्रश्न करत असतात. प्रत्येकवेळी नवीन व्यक्तीशी ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात. पण मी लग्न का करू?, मला आता लग्नाची गरज नाही. मी अविवाहितच चांगली आहे. जर नशिबात कोणाला भेटणे लिहलं असेल तर ती व्यक्ती नक्कीच भेटेल’. Pooja Bhatt|
पुढे ती म्हणाली, ‘लग्न जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. एखाद्याला भेटण्याची गरज असते, तेव्हा तो सापडतो. फक्त एक माणूस सर्व गोष्टींवर उपाय नसतो. आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनसाथी शोधण्यापेक्षा जोडीदार शोधणे चांगलं आहे. जर मला एक साथीदार मिळाला तर ती माझ्यासाठी सर्वोत्तम भेट असेल आणि जर मला तो मिळाला नाही तर मी माझ्या कुटुंब आणि मित्र परिवारांसोबत आनंदी आहे.’ Pooja Bhatt|
दरम्यान, पूजा भट्टने 2003 मध्ये मनीष माखिजासोबत लग्न केलं होतं. मात्र काही कारणामुळे लग्नाच्या ११ वर्षांनंतर पूजाने मनीष मखीजाबरोबर घटस्फोट घेतला. मात्र अद्याप तिने दुसरा विवाह केला नाही.
हेही वाचा: