नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत आलेल्या म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी रिझर्व्ह बॅंकेने 50 हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे त्या निर्णयाचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिंदंबरम यांनी स्वागत केले आहे. फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने सहा फंड योजना आर्थिक अडचणींमुळे बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचे गुंतवणूक क्षेत्रात विपरित पडसाद उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने ही उपाययोजना केली आहे.
फ्रॅंकलिन टेम्पल्टन कंपनीने आपल्या काही योजना बंद करण्याची घोषणा केल्यानंतर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे अशी प्रतिक्रिया चिंदंबरम यांनी शनिवारी व्यक्त केली होती. व या कंपन्यांच्या मदतीसाठी सरकारने पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. या क्षेत्रातील कंपन्या बंद होत राहिल्या तर देशातील गुंतवणुकीचे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने त्यात वेळीच लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.