नवी दिल्ली -आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणातून पुढे आलेल्या मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चिदंबरम यांनी याचिका दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने चिदंबरम यांना एकाच दिवशी दुहेरी झटका बसला.
चिदंबरम यांना दिलासा देण्याने तपासात अडथळे येऊ शकतात. चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) पुरेशी मोकळीक मिळायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने मे 2017 मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने त्याचवर्षी मनी लॉण्डरिंग प्रकरणी गुन्हा नोंदवला.