बिजापूर/दंतेवाडा – छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले, तर शेजारच्या सुकमा जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली. (Two ‘Bastar Fighters’ jawans injured in IED blast in Chhattisgarh’s Dantewada)
शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात वेगवेगळ्या सुरक्षा दलांचे जवान नक्षलविरोधी मोहिमेसाठी निघाले असताना ही चकमक झाली.
माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या ट्राय जंक्शनवर ही कारवाई करण्यात आली. राज्चाे जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बस्तर फायटर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्याची एलिट युनिट कोब्रा आणि तीन जिल्ह्यांतील स्पेशल टास्क फोर्सच्या जवानांनी या कारवाईत भाग घेतला. शुक्रवारी संध्याकाळी ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
राजधानी रायपूरपासून ४५० किमी अंतरावर असलेल्या पिडिया गावाजवळील जंगलाला सुरक्षा दलांनी वेढा घातला असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्यावेळी दोन बाजूंमध्ये तुंबळ गोळीबार झाला. बंदुका शांत झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह शस्त्रांसह सापडले, असे अधिकाऱ्याने सांगितले.ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, या परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
शुक्रवारी रात्री याच ऑपरेशनचा एक भाग म्हणून, दंतेवाडा-सुकमा सीमेवर नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसच्या हल्ल्यात बस्तर फायटरचे दोन जवान जखमी झाले, असे आयजी सुंदरराज यांनी सांगितले.त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे असे सांगण्यात येते.