पुणे – मध्य रेल्वेकडून मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-मडगाव आणि नागपूर-बिलासपूर या चारही मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहे. मागील महिन्याभरात जवळपास दीड लाख प्रवाशांनी वंदे भारतने प्रवास केला असून, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)-सोलापूर-मुंबई वंदे भारत सुसाट सुरू आहे. या ट्रेनला प्रवाशांची सर्वाधिक प्रवाशी संख्या आहे.
भारतीय रेल्वे विभागाकडून दुसऱ्या टप्प्यात मध्य रेल्वे क्षेत्रात चार नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दिला. त्यामध्ये मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत 10 फेब्रुवारी 2022, मुंबई-शिर्डी वंदे भारत 10 फेब्रुवारी 2022 आणि बिलासपूर-नागपूर वंदेभारत 11 डिसेंबर 2022 यासह मुंबई-मडगाव वंदेभारतही 2022 मध्ये सुरू झाली. अलिशान आणि गतीमान प्रवासामुळे प्रवाशांची या ट्रेनला पसंती मिळत आहे.
मागील महिन्याभरात 15 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबरदरम्यान, विशेषत: मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारतने आतापर्यंत 56 हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये 15 ते 45 वयोगटातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मुंबई-शिर्डी वंदेभारतने 44 हजार 857 प्रवाशांनी लाभ घेतला असून, बिलासपूर-नागपूर वंदेभारतने 29 हजार 772 आणि मुंबई-मडगाव वंदे भारतने 12 हजार 933 प्रवाशांनी लाभ घेतला आहे.
वयोगटानुसार वंदे भारतला मिळालेली पसंती
- मुंबई-सोलापूर-मुंबई (गाडी क्रमांक 22225/22226)
- एकूण प्रवासी 55,905 (पुरुष-34,016, महिला-21,881)
- 15 ते 30 वर्षे – 18,764 प्रवासी
- 31 ते 45 वर्षे – 18,042 प्रवासी
- 46 ते 60 वर्षे – 11,528 प्रवासी
- 60 पेक्षा अधिक वर्षे – 5,133 प्रवासी
- वयोगट 1 ते 14 वर्षे – 2,438 प्रवासी
- बिलासपूर-नागपूर-बिलासपूर (गा. क्र. 20825/20826)
- एकूण प्रवासी 29,772 (पुरुष-18,870, महिला-10,894)
- 31 ते 45 वर्षे – 9,736 प्रवासी
- 15 ते 30 वर्षे – 9,365 प्रवासी
- 46 ते 60 वर्षे – 10,657 प्रवासी
- 60 पेक्षा अधिक वर्षे – 2,852 प्रवासी
- 1 ते 14 वर्षे – 904 प्रवासी
- मुंबई-साईनगर शिर्डी (गाडी क्रमांक 22223/22224)
- एकूण प्रवासी 44,857 (पुरुष-25,149 आणि महिला-19,700)
- 31 ते 45 वर्षे – 14,123 प्रवासी
- 46 ते 60 वर्षे – 11,960 प्रवासी
- 15 ते 30 वर्षे – 10,657 प्रवासी
- 60 पेक्षा अधिक वर्षे – 5,582 प्रवासी
- 1 ते 14 वर्षे – 2,535 प्रवासी
- मुंबई-मडगाव-मुंबई
- एकूण प्रवासी 12,933 (पुरुष-7565, महिला-5363)
- 31-45 वर्षे – 3,812 प्रवासी
- 46-60 वर्षे – 3,342 प्रवासी
- 15-30 वर्षे – 2,753 प्रवासी
- 60 पेक्षा अधिक वर्षे – 2,285 प्रवासी
- 1-14 वर्षे – 738 प्रवासी