जेजुरी – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी (दि.20) तीर्थक्षेत्र जेजुरीत येऊन कुलदैवतांचे दर्शन घेतले. दुपारी ते मोटारीने थेट जेजुरी गडावर गेले. गडावर कुलदैवत खंडोबा म्हाळसादेवीची महापूजा अभिषेक, महाआरती केली. भंडाऱ्याची उधळणही त्यांनी केली.
कुलधर्मकुळाचाराचे कार्यक्रम उरकल्यानंतर मार्तंड देव संस्थांनतर्फे प्रमुख विश्वस्त ऍड अशोक संकपाळ, विश्वस्त संदीप जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार संजय जगताप, सुदाम इंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी माझे सर्व कुटुंब येथे दर्शनाला येऊन गेले. आज मीही देवदर्शन घेतल्याचे भुजबळ यांनी सांगितले.