दावडी- दावडी-धामणटेक रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटल्याने एकजण जखमी झाला आहे. हा टेम्पो कोंबडी खाद्य अवसरीवरून घेऊन पिंपळगाव येथे निघाला होता, त्यादरम्यान हा अपघात झाला.
अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिक दाखल झाल्याने टेम्पोचालक व वाहकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूरज गव्हाणे, मारुती गव्हाणे, भगवान गव्हाणे, दावडीचे उपसरपंच हिरामण खेसे, लहू गव्हाणे, संजय गव्हाणे उपस्थित होते. या मार्गावर वळणांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहे.