Chhagan Bhujbal । नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आले आहे.
नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झाले असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचे चित्र आहे. महायुतीतील दोन महत्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,’भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीला ग्रामीण भागातून विरोध दिसून येत आहे . ग्रामीण भागात भुजबळांविरोधात बॅनरबाजीही सुरू आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांना गावबंदी करण्याचा इशारा बॅनर्सद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे भुजबळांच्या उमेदवारीवरून आतापासूनच तणाव निर्माण झाला आहे. वाद होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी संबंधितांना बॅनर तत्काळ उतरवण्याचे निर्देश दिले आहे. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून सध्या महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chhagan Bhujbal । नेमकं काय लिहिले आहे बॅनरमध्ये
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या ग्रामीण भागातून तीव्र विरोध असणार हे नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील तर यांना मतदान करू नये असे बॅनर द्वारे आवाहन करण्यात आले आहे.
हे वाचले का ? सुषमा अंधारे बोलून गेल्या,’ठाण्यातून PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू’