दुबई – कर्णधार के एल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 178 धावांपर्यत मजल मारली.
Decent job with the bat! 👍
Time to defend now! #SaddaPunjab #IPL2020 #KXIP #KXIPvCSK pic.twitter.com/70u83PhPOj
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) October 4, 2020
पंजाबकडून के एल राहुलने पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 52 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांसह 63 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त मयंक अग्रवालने 26(19), मनदीप सिंहने 27(16) आणि निकोलस पूरनने 33(17) धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली. सरफराज खानने 9 चेंडूत नाबाद 14 आणि ग्लेन मॅक्सवेलने 7 चेंडूत नाबाद 11 धावांची खेळी केली.
चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 4 षटकांत 39 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. रविंद्र जडेजाने आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1 गडी बाद केला. जडेजाने 4 षटकांत 30 आणि चावलाने 2 षटकांत 22 धावा दिल्या. ड्वेन ब्रावो 4 षटकांत 38 आणि सॅम करनने 3 षटकांत 31 धावा दिल्या. दीपक चहरने 3 षटकांत 17 धावा दिल्या.