पुणे/मार्केटयार्ड – मार्केट यार्डातील दी पूना मर्चंट्स चेंबरकडून यंदाही दिवाळीत रास्त भावात (स्वस्त) लाडू-चिवडा विक्री उपक्रम राबवण्यात येणार आहे. याचा शुभारंभ दि. 4 नोव्हेंबर रोजी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. कच्चा माल महाग झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाडू-चिवड्याच्या भावात किलोमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. लाडू-चिवड्याचा किलोचा भाव 160 रुपये, तर अर्धा किलोचा भाव 85 रुपये असेल.
सायंकाळी साडेचार वाजता जयजिनेंद्र प्रतिष्ठान, नाजूश्री सभागृह (गंगाधामजवळ) येथे होणाऱ्या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पणन संचालक केदार जाधव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आदी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.
त्यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रवीण चोरबेले, संचालक दिनेश मेहता, नवीन गोयल, आशीष दुगड, उत्तम बाठिया आदी उपस्थित होते. लाडू-चिवडा निर्मितीसाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येणार आहे. दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ (फूड टेक्निशियन) नेमण्यात आले आहेत. कामगारांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.
येथे मिळणार स्वस्त लाडू-चिवडा
दी पूना मर्चंट्स चेंबर, (व्यापार भवन, मार्केट यार्ड), ग्राहक पेठ, (टिळक रस्ता), आझाद मित्र मंडळ, (पुष्प मंगल कार्यालय, बिबवेवाडी), जयश्री ग्रोसरी (मृत्युंजयेश्वर मंदिरासमोर, कोथरुड), भगत ट्रेडर्स (अभिरुची मॉलसमोर, सिंहगड रस्ता), जगदीश ट्रेडिंग कंपनी, (वैभव टॉकीजमागे), कुवाड कोठारी सप्लाय कंपनी, (विठ्ठल मंदिराजवळ, कर्वेनगर), व्ही. एन. एंटरप्रायजेस, (अभिनव सोसायटी, पद्मावती).
अर्बन बाझार (माणिकबाग), पवन ट्रेडर्स (संघर्ष चौक, चंदननगर), निखील ग्रोसरी(आळंदी), विजय ट्रेडिंग कंपनी, (कोणार्क पूरम सोसायटीसमोर, कोंढवा खुर्द), राजेंद्र छाजेड, (श्री वर्धमान जैन स्थानक भवन, आकुर्डी), संजय लढ्ढा, (साई सामाजिक संस्था, साततोटी चौकाजवळ, कसबा पेठ), श्री लक्ष्मी ब्युटी चॉइस शॉपी, (खडकी), सह्याद्री सेवा प्रतिष्ठान, (पर्वती), साई लक्ष्मी स्टोअर्स, (काळूबाईनगर, खराडी), बालाजी सुपर मार्ट, (धनकवडी), गौरवी मिल्क पार्लर ( राजयोग सोसायटी, वारजे), प्रिन्स शॉपिंग सेंटर, (शांतीनगर कॉर्नर, विश्रांतवाडी), मोदी टी सेंटर, (श्री शिवाजी मार्केटजवळ, लष्कर), ताराचंद गौड, (मिठापेल्ली हौसिंग सोसायटी, सेव्हन लव्हज चौक)