आयडीबीआय बॅंकेकडून व्याजदरात बदल

इलेक्‍ट्रिक वाहन खरेदीसाठी सवलत

पुणे – आयडीबीआय बॅंकेने दोन रेपो संलग्न उत्पादने दाखल केली आहेत. सुविधा प्लस होम लोन व सुविधा प्लस ऑटो लोन अशी ही दोन उत्पादने आहेत. ही उत्पादने भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) रेपो दराला अनुसरून असतील. या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना आपल्या विविध कर्जांचे व्याजदर रेपो दराशी जोडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार या बॅंकेने हा निर्णय घेतला आहेत. दि.1 ऑक्‍टोबरपर्यंत इतर बॅंकाही असे निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. कर्जाचा उठाव कमी झाल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.हा परिणाम कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळावी याकरीता बॅंका व्याजदराची फेररचना करीत आहेत.

आयडीबीआय बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार, वार्षिक किमान 6 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना सुविधा प्लस होम लोन व सुविधा प्लस ऑटो लोन ही उत्पादने दिली जातील. सुविधा प्लस होम लोन 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांपर्यंत दिले जाईल. सध्या, होम लोनवरील व्याजदर वार्षिक 8.30% पासून असेल.

तर, ऑन रोड किंमत समाविष्ट करत, 7 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 25 लाख रुपयांपर्यंत सुविधा प्लस ऑटो लोन दिले जाणार आहे. विशेषतः नव्या 4 चाकी वाहनासाठी कर्जे दिली जाणार आहेत. सध्या वाहन कर्जावरील व्याजदर वार्षिक 8.90% पासून असेल. सुविधा प्लस ऑटो लोन अंतर्गत इलक्‍ट्रिक कार खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 0.1 टक्‍क्‍याची सवलत दिली जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here