आयोगापुढे सफाई कर्मचाऱ्यांनी मांडली कैफियत

नगर – महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्‍न तसेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोई-सुविधांबाबत केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी गुरुवारी (दि.19) रोजी पालिकेत आढावा घेतला.

यावेळी आयुक्त श्रीकृष्णा भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, सुनिल चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. माजी नगरसेवक दीप चव्हाण यांच्यासह सुरज गोयल, विजय छजलानी, अमीत चव्हाण आदींनीही या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न मांडले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेत नियुक्ती देताना जर ते शिक्षीत असतील तर त्यांना सफाई कर्मचाऱ्याऐवजी शैक्षणिक पात्रतेनूसार नियुक्ती देण्याचे शासनाचे आदेश आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी दीप चव्हाण यांनी केली. त्याची लगेच पूर्तता करण्याच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिल्यानंतर सेवानिवृत्त सफाई कर्मचारी सुभाष गुलशन बेग यांच्या वारसास शैक्षणिक पात्रतेनूसार लिपीक पदाच्या नियुक्तीचे पत्र महापालिकेकडून देण्यात आले. चव्हाण यांनी 21 निलंबित सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न उपस्थित करत या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनूसार काम मिळणे अपेक्षित असताना त्यांना मूळ पदावर हजर करण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.