पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी स.प. महाविद्यालय येथे सभा होणार आहे. परिणामी शहर वाहतूक विभागाने टिळक रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत. गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक आवश्‍यकतेनुसार बंद किंवा वळवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश बुधवारी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी दिले. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येणार आहे.

या ठिकाणी असणार वाहतुकीत बदल
जंगली महाराज रोडवरील खंडोजीबाबा चौकातून संभाजी पुलाकडे न जाता उजवीकडे वळून कर्वे रोडने इच्छितस्थळी जावे.

दांडेकर पुलाकडून अलका टॉकीजकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहनांनी सावरकर चौक, मित्रमंडळ चौकामार्गे इच्छितस्थळी जावे.

स्वारगेट, सारसबागकडून टिळकरोडला जाणारी वाहतूक पुरम चौकातून बंद करण्यात येणार असून या वाहनचालकांनी बाजीराव रोडने इच्छितस्थळी
जावे.

शाहू पूल-दत्तवाडी-जनता वसाहत-पर्वती पायथ्याकडून येणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून नाथ पै चौक, एसपी कॉलेजकडे जाता येणार नाही. या वाहनांनी उजवीकडे वळून कल्पना हॉटेल, सणस पुतळ्याकडून इच्छितस्थळी जावे.

सणस पुतळा, कल्पना हॉटेलकडून येणारी वाहने ना.सी.फडके चौकातून सरळ नाथ पै चौकाकडे जाता येणार नाही. यासह डावीकडे वळून एस.पी.कॉलेज चौकाकडे जाणार नाहीत. त्यांनी केवळ शाहू पूलाकडे अथवा सिंहगड रोडने इच्छितस्थळी जावे.

नो-पार्किंग झोन
दि. 17 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत शास्त्री रोड, टिळक रोडवरील सर्व प्रकारची पार्किंग रद्द करण्यात येणार आहे. नमूद केलेल्या वेळामध्ये या परिसरात “नो-पार्किंग’ करण्यात येणार आहे.

या ठिकाणी करता येणार पार्किंग
नदीपात्र रस्ता, रेणुका स्वरूप शाळा, महाराष्ट्रीय मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल, सणस मैदान, मुक्‍तांगण शाळा, स्वारगेट, कटारिया स्कूल, नेहरू स्टेडियम, स्काऊट ग्राउंड, गरवारे कॉलेज, दत्तवाडी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.