चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवार दिनांक 8 जून रोजी एकही रुग्ण आढळला नाही आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.
7 जुनल एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 39 झाली होती . मात्र आज दिसभरात एकही रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण आहे
यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील 31 वर्षाच्या पुरुष , नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील 27 वर्षाचा व्यक्ती, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 36 वर्षाचा व्यक्ती, यवतमाळ वरून आलेला नागभीड तालुक्यातील पूनघाडा रिठ या गावचा 36वर्षीय व्यक्ती, ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा चाळीस वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील 45 वर्षाचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्ती सह ब्रह्मपुरी येथील covid-19 केअर सेंटर मधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी अडयाळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य 3 नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला 43 वर्षाचा व २७ वर्षाचा पुरूष आहे.तर गुजरात मधून आलेला पुंड सावली येथील एक व्यक्ती आहे.