चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; गृहमंत्रीपदावरून दिला होता ठाकरेंना सल्ला

मुंबई – गृह मंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसला देऊ नका, अन्यथा मातोश्रीवरही कॅमेरे लावण्यात येतील, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. डिसेंबर 2019 मधील चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचे डीजी होमगार्ड परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर सदर व्हिडिओमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्धव ठाकरे यांना सल्ला देत आहेत की, उद्धवजींनी काय करावे हे उद्धवजींनाच ठरवायचे आहे. परंतु आम्ही बराच काळ एकत्र काम केले आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे, म्हणून माझा सल्ला असा आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसला गृहमंत्री पद देऊ नका.

या व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्याकडे काहीही ठेवले नाही. गृहमंत्री हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले तर मातोश्रीकडे कॅमेरेही असतील. कारण मंत्र्यांकडे सर्व काही होत आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. गृह मंत्रालय उद्धवजींनी स्वत: कडे ठेवावे, असेही ते म्हणाले होते. तुम्ही त्यांना वित्त विभाग दिले, नगर विकास विभागही देऊ केले, पीडब्ल्यूडीदेखील दिले, मग स्वतःकडे काय ठेवले? फक्त मुख्यमंत्री पद?, असे म्हणताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.