राज्यांना लस खरेदी टाळण्याच्या सूचना
नवी दिल्ली – शक्य तितक्या लवकर जनतेला करोनाची लस देण्याची ब्लूप्रिंट केंद्राने तयार केली आहे. लस खरेदी व वितरणावर केंद्र लक्ष ठेवणार आहे. राज्यांनी समांतर खरेदी टाळावी असे सांगण्यात आले आहे.
या संदर्भातील समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी देशांतर्गत उत्पादन क्षमता किती आहे, आयात कोठून आणि किती करावी लागेल याचा आराखडा तयार करण्यात आला. लसीकरणासाठी डिजिटल सुविधांचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून परिस्थितीकडे लक्ष ठेवले जाणार आहे. कोणत्या क्षेत्रात अधिक संसर्ग आहे याकडे लक्ष देण्यात येणार असून अशा भागाला लवकर लस पुरविण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. भारतातील दोन कंपन्यांनी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
झायडसकडून स्वस्त औषध
दरम्यान कॅडीला झायडस ही कंपनी रेमडेसिवीर हे करोनावरील जेनेरिक औषध 2,800 रुपये प्रति डोस उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे देशातील लोकांना किफायतशीर दरात हे औषध उपचारासाठी उपलब्ध होईल असे कंपनीने म्हटले आहे.