Covid New Variant JN 1: देशातील कोरोना महामारीचे संकट टळलेले असतानाच आता त्याच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 चे देशावर संकट निर्माण झाले आहे. कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. केरळनंतर महाराष्ट्र आणि गोव्यात करोनाच्या नविन विषाणूचे 21रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात 1 रूग्ण आढळला आहे. यासाठी केंद्र सरकार देखील अलर्ट झाले आहे. देशात कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्यासह विविध राज्यांतील आरोग्य मंत्री, उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिकेतील कोविड रुग्णात झालेली वाढ पाहता आपल्याही कोविडच्या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी तयार राहावे लागेल. सणांचे दिवस पाहता सतर्कता आवश्यक आहे. कोविड अद्याप संपलेला नाही. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत केली जाईल. राज्यांनी कोविड चाचण्या वेगाने कराव्यात. कोविड पॉझिटिव्ह आणि निमोनियासारख्या आजारांचे जास्तीत जास्त नमुने दररोज INSACOG तपासणीसाठी पाठवा, जेणेकरून जीनोम सिक्वेसिंगमधून नव्या व्हेरिएंटचा शोध घेतला जाईल.”
Union Health Minister Dr @mansukhmandviya virtually chaired a high level meeting with health Ministers of various states to access the current status and preparedness on COVID 19.
MoS (Health) Prof @spsinghbaghelpr and @DrBharatippawar, Health Minister of Uttarakhand Shri… pic.twitter.com/uigH7V8S4a
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) December 20, 2023
यात चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच दर तीन महिन्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये ‘मॉक ड्रिल’ करण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्र्यांनी सूचना केल्या. तर जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविडचे सक्रिय रुग्ण खूपच कमी आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी बैठकीत दिली.
तसेच त्यांनी सतर्क राहण्याची गरज असून घाबरून जाऊ नये, असेही आरोग्य मंत्री मांडविया यांनी म्हटले आहे. दरम्यान, करोनाच्या नवीन विषाणून जेएन.1 सध्या अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये कहर करत आहे. मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत. रूग्णालयातील बेड देखील उपलब्ध नाहीत. सिंगापूरमध्ये नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, जेएन.1 या करोनाच्या विषाणू वेगाने पसरत आहे. परंतु मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, सावधगीरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.