खालापूर, (वार्ताहर) – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदाही जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करा, असे आवाहन खालापूर उपविभागिय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने खोपोली शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात होणारे कार्यक्रम, मिरवणूकींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहायक निरीक्षक सुजित गडदे, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, अभिजीत व्हरंबले, अलोक किस्मतराव, सुधाकर लहाने, नगरपालिकेचे अधिकारी गजानन जाधव, माजी नगरसेवक किशोर पानसरे, कैलास गायकवाड, विकी गायकवाड, विशाल गायकवाड त्यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करीत वेळेत मिरवणूक व इतर कार्यक्रम करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी केले. मिरवणुकीला गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी. स्वयंसेवक नियुक्त करून त्यांना ओळखपत्र द्यावे, अशी सूचना पोलिसांनी केली.