पणजी – टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयचे पथक उद्या गोव्यात जाणार आहे. गोवा सरकारने सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला मंजुरी दिली.
दरम्यान, सोनाली फोगाट गोव्यात पोहोचण्याच्या एक दिवसनंतर 23 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सोनाली यांच्या पीएसह पाच जणांना अटक केली आहे.