Government Jobs – केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने शुक्रवारी अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या नोकरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. खोटे कॉल लेटर, बनावट अपॉइंटमेंट लेटर आणि नोकरी शोधणाऱ्यांचे बनावट प्रशिक्षण डॉसियर या संबंधातील कागदपत्रे झडतीदरम्यान जप्त करण्यात आली आहेत.
केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या पदांसाठी परीक्षांची तयारी करणाऱ्या हताश बेरोजगारांना शोधून त्यांना फसवण्याचे काम ही टोळी करीत होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा हा उद्योग सुरू होता, त्यातून त्यांनी कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
“आरोपींनी बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनावट प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा प्रघात अवलंबला आणि नोकरी शोधणाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीचा अस्सलपणा दाखविण्याच्या उद्देशाने त्यानंतरचे प्रशिक्षण दिले.
सीबीआय अधिकाऱ्यांनी पाटणा, मुंबई, बंगळुरू, मंगलोर आणि धनबादसह साकीनाका, मुंबई येथील दोन आणि पाटणा येथल बनावट प्रशिक्षण केंद्रासह नऊ ठिकाणी छापे टाकले ज्यात सुमारे 25 बेरोजगार युवकांना खोट्या नियुक्त्या पत्रे देऊन प्रशिक्षण दिले जात होते.
फूड कार्पोरशन ऑफ इंडिया, रेल्वे, जीएसटी विभाग अशा केंद्र सरकारच्या विविध विभागांची खोटी नियुक्तीपत्रे या लोकांना दिली जात होती. त्यासाठी प्रत्येकाकडून दहा ते पंधरा लाख रूपये वसुल केले जात होते.