नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi Adityanath) यांची लखनौ येथे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो एक्सवर शेअर केला.
अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) सध्या सिनेक्षेत्रापासून दुरावले असले तरी सध्या ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येतात. काही महिन्यांपूर्वी धर्मेंद्र यांनी आपल्या सोशल मीडियावर शेतातील टाकलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. आता मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांनी योगी आदित्यनाथ यांची घेतलेली ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असे सांगण्यात येत आहे.
रॉकी और रानी की प्रेमकहानी (Rocky aur rani ki prem kahani) या चित्रपटात धर्मेंद्र शेवटचे दिसले होते. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्याबरोबरही धर्मेंद्र यांचा एक चित्रपट लवकरच येत आहे. इक्विस असे या चित्रपटाचे नाव असून तो सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारीत आहे.
प्रख्यात फिल्म अभिनेता श्री धर्मेंद्र जी से लखनऊ स्थित सरकारी आवास पर शिष्टाचार भेंट हुई।@aapkadharam pic.twitter.com/mbI7tTjEIv
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 11, 2023
धर्मेंद्र हे भाजपचे (bjp) एकेकाळचे माजी खासदारही आहेत. त्यांच्या पत्नी हेमामालिनी आणि पुत्र सनी देओल हेही सध्या भाजपचेच खासदार आहेत. तथापि सध्या वयोमानामुळे धर्मेंद्र राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांनी आज उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची अचानक घेतलेली भेट हा कुतुहलाचा विषय ठरली.