पिंपरी – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात कॅरम बोर्ड मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 6) रात्री काळेवाडी येथे घडली.
वसुधा काटवडे (वय 30) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. 7) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ बाळासाहेब काटवटे (वय 35, दोघेही रा. काळेवाडी) असे आरोपी पतीचे नाव आहे. बुधवारी रात्री वसुधा आणि सोमनाथ यांच्यात लाइट बंद करण्याच्या कारणावरून भांडण झाले. त्यावेळी संतापलेल्या आरोपी सोमनाथ याने पत्नी वसुधा यांच्या डोक्यात कॅरम बोर्ड मारून त्यांना जखमी केले.