मुंबई – भारतरत्न, गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांच्या वडिलांची म्हणजेच ‘मास्टर दीनानाथ’ मंगेशकर यांची आज 78 वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी पुण्यतिथीच्या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन दीदी करत असतात.
दरम्यान, देशात लॉकडाउन असल्यामुळे यंदा ते शक्य नाही. म्हणून लता दीदींनी दीनानाथ फाउंडेशनच्या वतीने प्रीती पाटकर यांच्या प्रेरणा फाउंडेशनला पाच लाख रुपये आणि स्वता: कडून दहा लाख रुपयांचा मदत निधी दिला आहे. दीदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
आज मेरे परमपूज्य पिताजी मास्टर दीनानाथ मंगेशकर जी की 78वी पुण्यतिथि है.इस साल हम कोरोना की वजह से पुण्यतिथि का कार्यक्रम नहीं कर सके इसका हमें दुख है.इस साल हम दीनानाथ प्रतिष्ठान की तरफ़ प्रीति पाटकर जी की प्रेरणा फ़ाउंडेशन को पाँच लाख और मेरी तरफ़ से दस लाख की राशि दे रहे हैं. pic.twitter.com/ar8VXM1hEq
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 24, 2020
त्या म्हणाल्या, “आज, माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ७८ वी पुण्यतिथी आहे. मात्र देशावर करोनाचं संकट असल्यामुळे आम्ही कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करु शकलो नाही याचं मला दु:ख आहे. पण यंदा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही दीनानाथ फाउंडेशनच्या वतीने प्रीती पाटकर यांच्या प्रेरणा फाउंडेशनला पाच लाख रुपये आणि माझ्याकडून दहा लाख रुपयांचा निधी देत आहोत”. असं दीदी आपल्या पोस्ट मध्ये म्हणाल्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बॅंक खात्यात दानशूर व्यक्ती तसेच संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.