India vs Afghanistan 2nd T20 Live Cricket Score and updates : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने मोहालीत पहिला T20 जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेण्यावर त्याची नजर आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bowl first in the 2nd T20I against Afghanistan.
Live – https://t.co/CWSAhSZc45 #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Osi7XlapR4
— BCCI (@BCCI) January 14, 2024
टीम इंडियाने दोन बदलांसह या सामन्यात प्रवेश केला आहे. शुभमन गिल आणि टिळक वर्मा यांच्या जागी विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात विराट कोहली 14 महिन्यांनंतर T20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मोहालीच्या सामन्यात तो खेळला नाही. साहजिकच या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट आणि पहिल्या सामन्यात शून्यावर धावबाद झालेला कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर असणार आहेत.
दरम्यान, तसेच, अफगाणिस्तान बलाढ्य संघ नसल्याने या मालिकेत विजय मिळवणे भारतासाठी मोठी गोष्टी असणार नाही. मात्र तरीही टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची असल्याने भारत ती मोठ्या फरकाने जिंकण्यास नक्कीच उत्सुक असेल. या मालिकेत आपली प्रतिभा दाखवून येणाऱ्या विश्वकरंडकात संघात आपली जागा पक्की करण्यासाठी नवीन खेळाडू मात्र आपला कस पणाला लावताना आपणास दिसणार आहेत.