India vs Afghanistan 2nd T20 Live Cricket Score and updates : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने मोहालीत पहिला T20 जिंकला होता. हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेण्यावर त्याची नजर आहे.
नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India opt to bowl in the second T20I in Indore 🏏#INDvAFG 📝: https://t.co/TZAWLBMoJt pic.twitter.com/q4R9zYiJzM
— ICC (@ICC) January 14, 2024
टीम इंडियाने दोन बदलांसह या सामन्यात प्रवेश केला आहे. शुभमन गिल आणि टिळक वर्मा यांच्या जागी विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात विराट कोहली 14 महिन्यांनंतर T20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मोहालीच्या सामन्यात तो खेळला नाही. साहजिकच या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट आणि पहिल्या सामन्यात शून्यावर धावबाद झालेला कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर असणार आहेत.
Two changes for #TeamIndia in the Playing XI.
Virat Kohli and Yashasvi Jaiswal come in for Tilak Varma and Shubman Gill.
Live – https://t.co/YswzeURSuH #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/J4XjBsaOue
— BCCI (@BCCI) January 14, 2024
दरम्यान, तसेच, अफगाणिस्तान बलाढ्य संघ नसल्याने या मालिकेत विजय मिळवणे भारतासाठी मोठी गोष्टी असणार नाही. मात्र तरीही टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची असल्याने भारत ती मोठ्या फरकाने जिंकण्यास नक्कीच उत्सुक असेल. या मालिकेत आपली प्रतिभा दाखवून येणाऱ्या विश्वकरंडकात संघात आपली जागा पक्की करण्यासाठी नवीन खेळाडू मात्र आपला कस पणाला लावताना आपणास दिसणार आहेत.
IND vs AFG Live : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.