जादा वीजबिले रद्द करून नवी द्या ; बारामती भाजपची महावितरणकडे मागणी

बारामती : महावितरणाने घरगुती, व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील दिलेली वाढीव रकमेची वीजबिले बिले रद्द करून नवीन स्वरूपात वीज बिले ग्राहकांना द्यावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बारामती शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी निवेदन आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मीटरचे रीडिंग न घेता महावितरणने ग्राहकांना वीज बिले सादर केले आहेत. वीज बिलांच्या रकमेत मोठी तफावत असून वाढीव स्वरूपाची वीज बिले ग्राहकांना देण्यात आले आहेत. बिलांचे आकडे पाहून ग्राहकांना देखील “शॉक’ बसला आहे. लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने वीज बिल भरण्यासाठी ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. त्यातून वाढीव वीज बिल याचा फटका ग्राहकांना बसत आहे. घरगुती व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना आलेले वाढीव वीज बिल रद्द करून नवीन स्वरूपात वीजबिल देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश मोठे, तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, शहर अध्यक्ष सतीश फाळके, युवा मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्‍वर माने, अनुसिचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष सुनील माने, किसान मोर्चा अध्यक्ष धनंजय गवारे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सामाजिक अंतर पाळून उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.