यशच्या “केजीएफ 2’चा ‘हा’ ट्रेलर बघितला का

“केजीएफ : चॅप्टर 1’मध्ये कन्नड अभिनेता यशच्या दमदार अभिनयानंतर त्याचे चाहते “केजीएफ : चॅप्टर 2’मध्ये रॉकी भाईला पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहात आहेत.

“केजीएफ: चॅप्टर 2’चा ट्रेलर रिलीज होण्यास इतका उत्साह आहे की, खुद्द यशच्या एका उत्साही चाहत्याने “केजीएफ : चॅप्टर 2′ ट्रेलर बनवून यू-ट्युबवर रिलीज केला आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

“केजीएफ : चॅप्टर 1’ला हिंदी, तमिळ आणि कन्नड चॅनलवर सॅटॅलाइट प्रीमियरच्या वेळी खूपच टीआरपी मिळाला होता. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. या चित्रपटामुळे यशला संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली.

सध्या यश आपल्या आगामी “केजीएफ: चॅप्टर 2’च्या तयारीत व्यस्त अहे. या चित्रपटातही त्याचा शानदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी यशने घेतलेल्या मेहनतीवरूनच याचा अंदाज बांधला जाऊ शकतो की, त्याने एका दहा मिनिटांच्या सीनसाठी तब्बल सहा महिने ट्रेनिंग घेतली होती.

दरम्यान, या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता संजय दत्तही झळकणार आहे. हा चित्रपट सिनेमागृह सुरू होताच रिलीज होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.