नवी दिल्ली – कॅनडात सुरू झालेल्या कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू व स्टार खेळाडू लक्ष्य सेन यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सिंधूने महिलांच्या एकेरीत यजमान कॅनडाच्या तालिया एनजी हीच्यावर 21-16, 21-9 अशी मात केली. या फेरीत आता सिंधूचा सामना जपानच्या नासुकी निदीयाराशी होणार आहे.
महिला एकेरीच्या अन्य सामन्यात भारताच्या ऋत्विका शिवानी गाड्डेला थायलंडच्या सुपानिदा काटेथॉंगकडून 21-12, 21-3 असा पराभव पत्करावा लागला.
पुरुष एकेरीत लक्ष्यने आगेकूच करताना थायलंडच्या कुनलावत विदीतसार्नवर 21-18, 21-15 असा विजय मिळवला. याच गटात भारताच्या बी. साईप्रणीतला मात्र, कोएल्होकडून 21-12, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला.