कॅलगरी :- राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनने येथे जपानच्या केंटा निशिमोटोवर सरळ गेममध्ये विजय मिळवत कॅनडा ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
मोसमाच्या सुरुवातीला फॉर्म शोधण्यासाठी संघर्ष करत जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर घसरलेल्या सेनने जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर असलेल्या जपानी खेळाडूला 21-17, 21-14 असे हरवून एका वर्षातील दुसऱ्या सुपर फायनलमध्ये प्रवेश केला.
21 वर्षीय सेनने 2021 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता रविवारी अंतिम फेरीत चीनच्या ली शी फेंगचे आव्हान असेल. माजी जागतिक क्रमवारीत 6 व्या स्थानावर असलेल्या सेनने गेल्या ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.
दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू मात्र तिचा अव्वल खेळ दाखवू शकली नाही. प्रथम मानांकित जपानची अकाने यामागुची हिने 14-21, 15-21 अशा फरकाने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत सिंधूवर मात केली.