पणजी : महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत अजूनही महाराष्ट्राला पदक पटकावता आलेले नाही.
सोनमला अंतिम फेरीत एकूण १६५.९ गुण मिळाले. सोनमने पात्रता फेरीत ६२८.१ गुण मिळवले. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्राचीआणखी एक स्पर्धक अनन्या नायडू (६२७.१ गुण) अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली.
या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मेहुली घोषला सुवर्ण, हरयाणाच्या नॅन्सीला रौप्य आणि बंगालच्या स्वाती चौधरीला कांस्यपदक मिळाले.