संगमनेर – अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-2020 युवा संस्कृतीत महोत्सवात संबोधित केले. यावेळी सकाळी 11 वाजता संवाद तरुणाईंशी या कार्यक्रमात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ना. आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी या राजकारणातील तरुण पिढीची मुलाखत गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली.
दरम्यान, मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले,’माझा उल्लेख आदित्य साहेब असा करण्यात येतो. प्रोटोकॉल जरी लागू झाला असला तरी मी प्रत्येक माणसाला सांगतो. मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका.’
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘आम्ही तरुण आमदार एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी करू इच्छितो. ज्या ज्या मिनिटाला जे गरजेचं असतं, ते केलं पाहिजे. टेन्शन बाजूला सोडून मजा करणं गरजेचं आहे. मी अनेक फेस्टिव्हल पाहिले, पण थोडं वेगळं आहे. युवा पिढी मनातले प्रश्न विचारलाय लागली आहे. आधी मंत्री, नेते समोर असल्यावर तरुणांवर थोडं दडपण असायचं. शपथविधीसाठी आईचं नाव घेणं हा माझ्यासाठी मोठा क्षण होता.’ याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे.