पुणे – पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता बदलण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेता हे पद एक वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आले होते. या पदाचा एक वर्षाचा कालावधी समाप्त झाला होता.