राजकोट : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे होत आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
2nd ODI. Australia win the toss and elect to field https://t.co/v6DBzYXZJU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) January 17, 2020
तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ या स्थितीत आहे. त्या दृष्टीने भारतीय कर्णधार विराटने संघात दोन बदल केले आहे. पहिल्या वन-डेत डोक्याला चेंडू लागल्याने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुस-या वन-डे ला मुकल्याने त्याच्या ऐवजी मनीष पांडेला तर अष्टपैलू शार्दुल ठाकूर ऐवजी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आलं आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह.
2nd ODI. India XI: R Sharma, S Dhawan, KL Rahul, V Kohli, S Iyer, M Pandey, R Jadeja, K Yadav, M Shami, N Saini, J Bumrah https://t.co/v6DBzYXZJU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) January 17, 2020
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने संघात कोणताही बदल केला नसून पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, ऐरन फ़िंच, मार्नस लबुशेन, स्टीव स्मिथ, अश्टन टर्नर, एलेक्स कैरी, एश्टन एगर, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, एडम ज़म्पा.
2nd ODI. Australia XI: A Finch, D Warner, M Labuschagne, S Smith, A Carey, A Turner, A Agar, P Cummins, M Starc, K Richardson, A Zampa https://t.co/v6DBzYXZJU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) January 17, 2020
दरम्यान, राजकोट मधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारताने आधीच्या दोन्ही एकदिवसीय लढती गमावल्या आहेत. यामध्ये पहिला एकदिवसीय सामना २०१३ मध्ये इंग्लंडविरूध्द तर दुसरा सामना २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द झाला होता.