शिक्रापूर-हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलाचा नुकताच महिनाभरापूर्वी विवाह झालेला असताना अचानक त्याला दुर्धर आजार झाला. या आजाराचे नुकतेच निदान झाले असून, त्यावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांची आवश्यकता आहे. कुटुंबाच्या परिस्थिती नसल्याने उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिवरे कुंभार येथील संताजी जाधव या शेतकऱ्याच्या अमित जाधव या एकुलत्या एक मुलाने डिप्लोमापर्यंत शिक्षक घेऊन चाकण येथील खासगी कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीमध्ये नोकरीला सुरूवात केली. नोकरी सुरु असताना महिन्यापूर्वीच अमितचा विवाह झाला आणि दोन-तीन दिवसातच अमित आजारी पडला. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला पुणे येथील कोलंबिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अमितला ब्रेन ट्युमर आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. शस्त्रक्रियेसाठी तब्बल 25 लाख रुपये इतकी रक्कम लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जाधव कुटुंबीयांची परिस्थिती बेताची असल्यामुळे अमितवर उपचार करणे देखील अवघड झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत तीन लाख रुपये निधी गोळा केला असून अमितच्या नातेवाइकांनी देखील काही प्रमाणात आर्थिक मदत करून दोन लाख रुपये रक्कम गोळा केली. दानशुरांना अमितच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
- अमितच्या आर्थिक मदतीसाठी माहिती…..
नाव संदीप हरिभाऊ जाधव, आयडीबिआय बॅंक शाखा जातेगाव बुद्रुक खाते नंबर 1785104000025522 आयएफएस कोड खइघङ0001785. हे खाते अमितच्या चुलत भावाचे असून तो हॉस्पिटलची सर्व कामे सांभाळत आहे.